नवी दिल्ली -क्रिकेट आणि बॉलीवूड यांचे नाते वेळोवेळी समोर येत असते. बऱ्याच क्रिकेटपटुंची नावे बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या हे देखील रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता स्वत: हार्दिकने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
हेही वाचा -ब्रॅडमन यांना १०० सरासरीपासून वंचित ठेवणारा उमदा खेळाडू हरपला - शरद पवार
यावेळी हार्दिकचे नाव उर्वशी रौतेला सोबत नाही तर, नताशा स्टॅनकोव्हिकशी जोडले गेले आहे. रविवारी हार्दिकने आपल्या इंन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला होता. त्या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्याने 'मी प्रेमात आहे', असे लिहिले होते. त्यावर नताशाने त्याला 'तुच प्रेम आहेस', असे म्हटले आहे.