महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पांड्याची 'मॉन्स्टर' कामगिरी, दिग्गज कंपनीचा बनला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!

मॉन्स्टर एनर्जीने याआधी जगातील नामंवत क्रीडापटूंसोबत करार केला आहे. यामध्ये अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप सुपरस्टार कॉनर मॅकग्रेगर, मोटोजीपी लीजेंड व्हॅलेंटिनो रॉसी, फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस यांचा समावेश आहे.

hardik pandya become brand ambassador of energy drink monster
पांड्याची 'मॉन्स्टर' कामगिरी, दिग्गज कंपनीचा बनला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!

By

Published : Jan 13, 2020, 5:02 PM IST

नवी दिल्ली - एनर्जी ड्रिंक ब्रँड 'मॉन्स्टर एनर्जी'ने अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला भारतात आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून जाहीर केले आहे. भारतातील तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास प्रेरित करणे, हे या कराराचे उद्दिष्ट असल्याचे मॉन्स्टरने सांगितले. जागतिक पातळीवर मोठी कंपनी असलेल्या मॉन्स्टर एनर्जीमध्ये सामील होणारा हार्दिक हा पहिला भारतीय आहे.

हेही वाचा -'कसोटी क्रिकेट म्हणजे चार दिवसाचं चादणं नव्हे', सेहवागनं दिलं आपलं मत

मॉन्स्टर एनर्जीने याआधी जगातील नामंवत क्रीडापटूंसोबत करार केला आहे. यामध्ये अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप सुपरस्टार कॉनर मॅकग्रेगर, मोटोजीपी लीजेंड व्हॅलेंटिनो रॉसी, फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस यांचा समावेश आहे.

'मॉन्स्टर एनर्जी कुटुंबाचा भाग असल्याचा मला खूप आनंद झाला. मी नेहमीच माझ्या जगण्यावर आणि माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो ज्यामुळे मला दररोज प्रेरणा मिळते. मला आनंद आहे की मॉन्स्टर एनर्जी देखील त्याच याच तत्त्वांच्या बाजूने उभी आहे', असे हार्दिकने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details