महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धक्कादायक!..भारताच्या क्रिकेपटूची बॅट चोरीला - हरभजन सिंग लेटेस्ट न्यूज

मुंबई ते कोईम्बतूर असा विमानप्रवास करत असताना भज्जीची एक बॅट चोरीला गेली. बॅट गहाळ झाल्यानंतर भज्जीने ट्विटरवर इंडिगोकडून उत्तर मागितले.

Harbhajan Singh's bat stolen in IndiGo flight
धक्कादायक!..भारताच्या क्रिकेपटूची बॅट चोरीला

By

Published : Mar 11, 2020, 1:36 PM IST

नवी दिल्ली - भारताचा अनुभवी क्रिकेटपटू हरभजन सिंगबाबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई ते कोईम्बतूर असा विमानप्रवास करत असताना भज्जीची एक बॅट चोरीला गेली. या घटनेनंतर, भज्जीने 'इंडिगो' या विमान कंपनीला धारेवर धरत त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा -भारताचा भालाफेकपटू शिवपाल करणार पहिल्यांदाच ऑलिम्पिकवारी

बॅट गहाळ झाल्यानंतर भज्जीने ट्विटरवर इंडिगोकडून उत्तर मागितले. 'काल मी मुंबईहून कोईम्बतूर इंडिगो विमान क्रमांक ६E ६३१३ ने प्रवास केला आणि मला माझ्या किट बॅगमधून एक बॅट हरवल्याचे आढळले !! संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे. एखाद्याच्या सामानातून काहीतरी उचलणे ही चोरी आहे. कृपया मदत करा', असे ट्विट भज्जीने केले. त्यावर इंडिगोने त्वरित चौकशी करू असे उत्तर दिले होते. मात्र, ४८ तासानंतरही काही चौकशी न झाल्याने भडकलेल्या भज्जीने अजून एक ट्विट केले.

'माझ्या किट बॅगमधून माझा बॅट हरवल्यानंतर मला तुमच्याकडून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. आपण हे गंभीरपणे घेत नाही का?', असे भज्जीने इंडिगोला पुन्हा ट्विट करून विचारले आहे.

२०१५ मध्ये भारतीय संघासाठी हरभजनने अखेरचे एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळले होते. २०१६ मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details