नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. इतकेच नव्हे तर, द्रविड क्षेत्ररक्षणातही 'दादा' असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. भारताचा स्टार फिरकीपटू हरभजन सिंगने द्रविडच्या याच क्षेत्ररक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
हरभजन सिंगने ट्विटरवर द्रविडचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. द्रविडने घेतलेले उत्कृष्ट झेल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. आकाश चोप्रा, रविचंद्रन अश्विनही हे क्रिकेटपटू तर समालोचक हर्षा भोगले यांनीही द्रविडच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.