मुंबई- भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने प्रेक्षकांविना तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा खेळवण्याला हरकत नसल्याचे सांगितले. त्याने आयपीएलवर अनेक लोकांचा रोजगार अवलंबून असल्याचे सांगत, प्रेक्षकांशिवाय आयपीएल, या पर्यायाला पाठिंबा दर्शवला आहे.
हरभजन एका क्रीडा वाहिनीशी बोलताना म्हणाला, आयपीएलसाठी प्रेक्षक महत्वाचे आहेतच. पण प्रतिकूल परिस्थिती आल्यास त्यांच्याशिवाय आयपीएल खेळवण्यास काहीच हरकत नाही. खेळाडू म्हणून मला ते कदाचीत आवडणार नाही, पण सर्व चाहत्यांना त्यांच्या घरात बसून टीव्हीवर सामने पाहता येतील.'
आयपीएलवर अनेकांचे आयुष्य अवलंबून आहे. पण, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आपण ही स्पर्धा खेळवायला हवी, असे हरभजन म्हणाला. दरम्यान, आयपीएलमध्ये हरभजन चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे.