महाराष्ट्र

maharashtra

हरभजन सिंग क्रिकेटबाबत करणार मोठा खुलासा

By

Published : Sep 13, 2020, 4:26 PM IST

हरभजनने एक ट्विट करून क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "आज क्रिकेट खूप चर्चेत आहे आणि मला नुकतेच काही कळले आहे, ज्यामुळे क्रिकेट पाहण्याचा दृष्टीकोन तुमचा कायमचा बदलेल", असे हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Harbhajan singh is about to make a big disclosure about cricket
हरभजन सिंग क्रिकेटबाबत करणार मोठा खुलासा

नवी दिल्ली -टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आजकाल सतत चर्चेत असतो. हरभजनने अचानक आयपीएल २०२०मधून नाव मागे घेत सर्वांना चकित केले. अनुभवी हरभजन सिंगने घरगुती कारण सांगून या स्पर्धेतून माघार घेतली.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी हरभजनने एक ट्विट करून क्रिकेट चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. "आज क्रिकेट खूप चर्चेत आहे आणि मला नुकतेच काही कळले आहे, ज्यामुळे क्रिकेट पाहण्याचा दृष्टीकोन तुमचा कायमचा बदलेल. #cricketkakhulasa", असे हरभजनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हरभजनचे हे ट्विट कोणत्या विषयाच्या संदर्भात आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतू हरभजन क्रिकेटबद्दल नेमका काय मोठा खुलासा करणार याबद्दल चाहत्यांमध्ये नक्कीच उत्सुकता आहे. काही चाहत्यांनी त्याचे हे ट्विट मॅच फिक्सिंगशी संबंधित धक्कादायक खुलासे करण्याबाबत असेल, असा अनुमान लावला आहे.

हरभजन सिंग २०१६पासून भारतीय संघातून बाहेर आहे. भज्जीने टीम इंडियाकडून १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४७१, २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ आणि २८ टी-२०मध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details