महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धोनीच्या संघातून बाहेर पडला वर्ल्डकप विजेता खेळाडू

आयपीएलमध्ये हरभजन सिंगने १६० सामन्यांत १५० बळी घेतले आहेत. २०१८ च्या हंगामापूर्वी हरभजन २ कोटींच्या बोलीवर चेन्नई संघात दाखल झाला. तत्पूर्वी, तो पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता.

Harbhajan Singh confirms exit from CSK ahead of IPL 2021
धोनीच्या चेन्नई संघातून बाहेर पडला वर्ल्डकप विजेता खेळाडू

By

Published : Jan 20, 2021, 3:09 PM IST

नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामापूर्वी अनुभवी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने चेन्नई सुपर किंग्जमधून (सीएसके) बाहेर पडल्याची माहिती दिली आहे. हरभजनने ट्विटरवर सुंदर आठवणींसाठी सीएसकेच्या व्यवस्थापनाचे आणि चाहत्यांने आभार मानले आहेत. यासह हरभजनचा सीएसकेसोबतचा तीन वर्षाचा करार संपुष्टात आला आहे.

हरभजन सिंग

हेही वाचा - सतर्क राहा, खरा संघ आता येतोय; पीटरसनने टीम इंडियाला डिवचले

आयपीएलमध्ये हरभजन सिंगने १६० सामन्यांत १५० बळी घेतले आहेत. २०१८ च्या हंगामापूर्वी हरभजन २ कोटींच्या बोलीवर चेन्नई संघात दाखल झाला. तत्पूर्वी, तो पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता.

भज्जीचे ट्विट

गेल्या वर्षी तो चेन्नई संघात होता. परंतु वैयक्तिक कारणास्तव त्याने आयपीएलसाठी यूएईचा प्रवास न करता स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आयपीएल २०१९च्या हंगामात हरभजनने ११ सामन्यांत १६ गडी बाद करत चेन्नईला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कारकीर्द -

हरभजन सिंग २०१६पासून भारतीय संघातून बाहेर आहे. भज्जीने टीम इंडियाकडून १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४७१, २३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ आणि २८ टी-२०मध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला, तर त्याचवर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हरभजनन २००७ आणि २०११ च्या वर्ल्डकप विजेच्या टीम इंडियाचा सदस्य राहिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details