महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मी खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र नाही - हरभजन सिंग

पहिल्या ट्विटमध्ये हरभजनने लिहिले, "मला बर्‍याच जणांचे फोन येत आहेत, जे विचारत आहेत की पंजाब सरकारने माझे खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन का मागे घेतले? खेलरत्न पुरस्कारासाठी तीन वर्षे आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहिली जात असल्याने मी या पुरस्कारासाठी पात्र नाही.

Harbhajan singh ask punjab government to withdraw his khel ratna nomination
मी खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र नाही - हरभजन सिंग

By

Published : Jul 18, 2020, 6:11 PM IST

नवी दिल्ली -भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने पंजाब सरकारला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. आपण या पुरस्कारास पात्र नाही, असे ट्विट हरभजनने केले आहे.

पहिल्या ट्विटमध्ये हरभजनने लिहिले, "मला बर्‍याच जणांचे फोन येत आहेत, जे विचारत आहेत की पंजाब सरकारने माझे खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन का मागे घेतले? खेलरत्न पुरस्कारासाठी तीन वर्षे आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहिली जात असल्याने मी या पुरस्कारासाठी पात्र नाही.

हरभजनने दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले, "यात पंजाब सरकारची कोणतीही चूक नाही. कारण त्यांनी माझे नाव काढून चांगले केले. मी माझ्या माध्यमातील मित्रांना आवाहन करतो की, त्यांनी याविषयी काही अंदाज लावू नये. धन्यवाद."

"माझ्या खेलरत्न पुरस्कारासाठी नामनिर्देशित केल्याबद्दल संभ्रम आणि अटकळ आहे, म्हणून मी हे स्पष्ट करतोय. होय, गेल्या वर्षी माझे नामांकन उशिरा पाठवण्यात आले होते", असेही हरभजन म्हणाला.

याआधीच्या पंजाब सरकारने हरभजनच्या खेलरत्नाची उमेदवारी अंतिम तारखेनंतर पाठवली होती, जी क्रीडा मंत्रालयाने रद्द केली. यावेळी नामांकन वेळेवर पाठवण्यात आले असले, तरी राज्य सरकारने कोणतेही स्पष्टीकरण न देता ते मागे घेतले.

भारताकडून 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या 39 वर्षीय हरभजनने मर्यादित षटकांच्या स्वरूपात 294 बळी घेतले आहेत. त्याने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला, तर त्याचवर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details