विशाखापट्टणम -आयपीएलमध्ये चेन्नई आणि दिल्ली यांच्यात खेळल्या जात असलेल्या 'क्वालिफायर-२’ सामन्यात चेन्नईचा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंहने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात हरभजन दिल्लीचे २ विकेट घेत आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेण्याचा विक्रम केलाय.
हरभजनने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगीरी करणारा ठरला चौथा गोलंदाज - chennai Super Kings
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा १६९ विकेटसह पहिल्या स्थानी
या सामन्यात हरभजन सिंहने दिल्लीचा सलामिवीर शिखर धवन आणि शेरफाने रुदरफोर्डला बाद करताच आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला. यासह हरभजनने सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. आयपीएलमध्ये अशी अशी कामगीरी करणारा हरभजन हा अमित मिश्रा आणि पियुष चावला यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा १६९ विकेटसह पहिल्या,अमित मिश्रा १५६ विकेटसह दुसऱ्या तर १५० विकेटसह हरभजन सिंह आणि पियुष चावला अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.