महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Happy Diwali २०२०: विराट कोहली, रहाणेसमवेत देशी-विदेशी खेळाडूंनी दिल्या दीपोत्सवाच्या शुभेच्छा - विराट कोहली

दिवाळीचे औचित्य साधून भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडूंनीही चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy Diwali 2020 : Virat Kohli Greets Fans on the Occasion of Diwali 2020
Happy Diwali २०२०: विराट कोहली, रहाणेसमवेत देशी-विदेशी खेळाडूंनी दिल्या दीपोत्सवाच्या शुभेच्छा

By

Published : Nov 14, 2020, 3:09 PM IST

मुंबई – भारतामध्ये सर्वत्र दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीचे औचित्य साधून खेळाडूंनीही चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे यात भारतीय खेळाडूंसह विदेशी खेळाडूंनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, युजवेंद्र चहल, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, नवदीप सैनी, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना यांच्यासह पी. टी. उषा, सुशिल कुमार, रितू फोगाट यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने देखील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"सर्वांना आनंदी, आणि सुरक्षित दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास चांगले आरोग्य, आनंद, समृद्धी आणि यश लाभो. चांगला काळ परत येऊ दे आणि जगात शांती व ऐक्य निर्माण होवो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा," अशा आशयाचे ट्विट माजी ऑलिम्पिक ट्रॅक अँड फील्ड अ‍ॅथलीट पीटी उषा हिने केले आहे.

हेही वाचा -युएईमधून आणलं सोनं; क्रिकेटपटू कृणाल पांड्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ताब्यात

हेही वाचा -आजच्याच दिवशी हिटमॅन रोहितने केली होती 'ती' अविश्वसनीय खेळी

ABOUT THE AUTHOR

...view details