महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Happy Birthday Rohit : हिटमॅनचे खास विक्रम, ज्याला तोडणं सोप्प नाही... - रोहित शर्माचा वाढदिवस

रोहित भारताचा २८० वा कसोटी, १६८ वा एकदिवसीय आणि १७ वा टी-२० खेळाडू आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. वाचा रोहितचे खास रेकॉर्डस्...

happy birthday rohit sharma hitman amazing and records in cricket
Happy Birthday Rohit : हिटमॅनचे खास विक्रम, ज्याला तोडणं सोप्प नाही...

By

Published : Apr 30, 2020, 10:31 AM IST

मुंबई- टीम इंडियाचा 'हिटमॅन' सलामीवीर रोहित शर्माचा आज वाढदिवस. रोहित आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करतो आहे. कोरोनामुळे भारतात लॉकडाउन असल्याने, यंदा रोहित कुटुंबासोबत साध्यापणाने वाढदिवस साजरा करणार आहे. रोहित भारताचा २८० वा कसोटी, १६८ वा एकदिवसीय आणि १७ वा टी-२० खेळाडू आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. वाचा रोहितचे खास रेकॉर्डस्...

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये व्यक्तिगत सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम रोहितच्या नावे आहे. त्याने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना २६४ धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या आहे.
  • रोहितने आजघडीपर्यंत सर्वाधिक वेळा, आठ वेळा १५० पार धावा केल्या आहेत. हा ही एक विक्रम आहे.
  • एकदिवसीय क्रिकेटच्या, एका सामन्यात खेळताना सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहितने २०१३ मध्ये बंगळुरूत ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना २०९ धावांची खेळी केली होती. यात त्याने १६ षटकार लगावले.
  • एका एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक चौकार रोहितने लगावले आहेत. त्याने २०१४ मध्ये कोलकातात श्रीलंकाविरुद्ध खेळताना २६४ धावांची खेळी केली होती. यात त्याने तब्बल ३३ चौकाराची बरसात केली.
  • भारताकडून क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकण्याच्या रोहित शर्मा एलिट क्लबचा सदस्य सदस्य आहे. त्याच्याशिवाय केवळ सुरेश रैना आणि केएल राहुल हे भारतासाठी करू शकले आहेत.
  • एकदिवसीय सामन्यात फक्त सात वेळा फलंदाजांनी दुहेरी शतक ठोकली असून त्यापैकी रोहितने तीन दुहेरी शतकं केली आहेत. रोहितशिवाय सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांनी दुहेरी शतक झळकावले आहे.
  • रोहितने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूत टी-२० शतक ठोकले जे आंतरराष्ट्रीयटी-२० क्रिकेटमध्ये डेव्हिड मिलरबरोबर संयुक्तपणे सर्वात वेगवान शतक आहे.
  • इंग्लंडमधील २०१९ विश्वकरंडक रोहितसाठी अधिक खास ठरला. या विश्वकरंडकात रोहितने पाच शतकं केली. त्याने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड बांगलादेश आणि श्रीलंकाविरुद्ध शतक ठोकले, जे टूर्नामेंटच्या एका आवृत्तीत फलंदाजाने केलेले सर्वाधिक आहे.
  • रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. त्याने आजघडीपर्यंत २४४ षटकार लगावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details