नवी दिल्ली - भारतीय कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारीने रोहित शर्माला सर्वोत्तम एकदिवसीय सलामीवीर म्हणून निवडले आहे. विहारीच्या एका चाहत्याने विचारले की, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यापैकी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट सलामीवीर कोण? त्याला उत्तर म्हणून विहारीने रोहित शर्माची निवड केली.
विहारीने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला आवडता क्रिकेटपटू म्हटले आहे. तर, सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी या दोघांचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून वर्णन केले आहे.