महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

HAPPY B'Day GRAMEA SMITH: ३८ वर्षाचा झाला दक्षिण आफ्रिकेचा सर्वात तरुण कर्णधार - दक्षिण आफ्रिका

उंच आणि डाव्या हाताने फलंदाजी करणारा स्मिथ सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याच्या नेतृत्वात आफ्रिकेचा संघ जगात अव्वल स्थानावर पोहचला होता.

गप

By

Published : Feb 1, 2019, 8:15 PM IST

जोहान्सबर्ग-दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात तरुण कर्णधार ग्रॅमी स्मिथचा आज(१ फेब्रुवारी)वाढदिवस आहे.स्मिथचा जन्म १ फेब्रुवारी १९८१ रोजी जोहान्सबर्ग येथे झाला.उंच आणि डाव्या हाताने फलंदाजी करणारा स्मिथ सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो.त्याच्या नेतृत्वात आफ्रिकेचा संघ जगात अव्वल स्थानावर पोहचला होता.

क्रिकेट कारकिर्द

ग्रॅमी स्मिथने ८ मार्च २००२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.तर,१२ वर्षानंतर १ मार्च २०१४ साली त्याने कसोटीतून निवृत्ती घेतली.एकदिवसीय सामन्यांत त्याने ३० मार्च २००२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध २७ नोव्हेंबर २०१३ साली एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतली.

स्मिथने ११७ कसोटी सामने खेळताना ४७.७६ च्या सरासरीने ९ हजार २६५ धावा केल्या आहेत.यात त्याच्या नावावर २७ शतके आणि ३८ अर्धशतके आहेत.तर,१९७ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ३७.७८ च्या सरासरीने ६ हजार ९८९ धावा केल्या आहेत.एकदिवसीय प्रकारात त्याच्या नावावर १० शतके आणि ४७ अर्धशतके आहेत.याबरोबरच त्याने इंग्लंड येथे लॉर्डसच्या मैदानावर २५९ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. लॉर्डच्या इतिहासात ही आतापर्यंत कोणत्याही विदेशी खेळाडूने केलेली सर्वात मोठी खेळी आहे.

वैयक्तीक जीवन

ग्रॅमी स्मिथ लवकरच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे.२ मुलांचा वडील असणाऱ्या स्मिथने स्वत:याची घोषणा केली आहे. तो रोमी लॉनफ्रांची हिच्यासोबत विवाह करणार आहे. याआधी त्याने आयरिश गायिका मोर्गन डीनसोबत २०११ साली विवाह केला होता. स्मिथ आणि मोर्गन यांना २०१२ साली मुलगी कॅन्डीस तर २०१३ साली मुलगा कार्टर झाला होता. २०१५ साली दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details