दुबई - यूएईमध्ये खेळल्या जाणार्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सीएसकेचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तो लवकरच संघात दाखल होऊ शकतो.
ऋतुराजची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी तो आज होणाऱ्या मुंबईविरूद्धच्या सामन्यासाठी अनुपस्थित असेल. आजपासून आयपीएलच्या तेराव्या पर्वाला सुरुवात होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऋतुराजची २४ तासात पुन्हा कोरोना चाचणी होईल. महत्त्वाचे म्हणजे गायकवाड आयपीएल २०२०चे काही सामने खेळणार नाही. कारण, बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार खेळाडूला खेळण्यापूर्वी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागते. २-३ दिवसांनंतर ही फिटनेस टेस्ट घेतली जाईल.