महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 19, 2019, 9:30 PM IST

ETV Bharat / sports

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू

अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी किंग्स इलेवन पंजाब आणि दिल्ली कॅपीटल्सच्या संघ मालकांमध्ये जोरदार चढाओढ लागली होती. शेवटी किंग्स इलेवन पंजाबने 10 कोटी 75 लाख इतकी रक्कम देऊन मॅक्सवेलला आपल्या चमूमध्ये घेतले.

ग्लेन मॅक्सवेल
ग्लेन मॅक्सवेल

कोलकाता - 2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सध्या खेळाडूंचे लिलाव सुरू आहेत. आत्तापर्यंत लिलावात परदेशी खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची किंमत मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला किंग्स इलेवन पंजाबने 10 कोटी 75 लाख इतकी घसघशीत रक्कम मोजून खरेदी केले आहे. मॅक्सवेल आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्वात महागडा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.


अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी किंग्स इलेवन पंजाब आणि दिल्ली कॅपीटल्सच्या संघ मालकांमध्ये जोरदार चढाओढ लागली होती. शेवटी किंग्स इलेवन पंजाबने मॅक्सवेलला आपल्या चमूमध्ये घेतले. विशेष म्हणजे मॅक्सवेलची बेस प्राईस फक्त दोन कोटी रुपये इतकी होती. म्हणजे तो त्याला चारपट जास्त रक्कम देऊन खरेदी करण्यात आले आहे.

हेही वाचा - एकेकाळी विकायचा पाणीपुरी; आता झाला करोडपती

किंग्स इलेवन पंजाबने आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी संघाचा कर्णधार कोण असेल, याची अद्याप घोषणा केलेली नाही. त्यामुळे अष्टपैलू मॅक्सवेल हा पंजाब संघासाठी कर्णधार म्हणून चांगला पर्याय ठरू शकतो. मॅक्सवेलने यापूर्वीही पंजाबचे कर्णधारपद भूषवलेले आहे. मानसिक आरोग्य अस्वस्थेच्या कारणामुळे गेले काही दिवस मॅक्सवेल क्रिकेटपासून लांब आहे. किंग्स इलेवन पंजाबने खरेदी केल्यानंतर त्याने संघ व्यवस्थापनाचे व्हिडिओद्वारे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details