मुंबई - वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेलने भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहलला ट्रोल केले आहे. “सोशल मीडियावर तू खूप पकवतोस”, असे गेलने चहलला म्हटले आहे. लॉकडाऊनदरम्यान चहल सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह आहे. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर चहल खूप व्हिडिओ पोस्ट करत असल्याने गेलने चहलला ‘रोस्ट’ केले आहे.
“सोशल मीडियावर तू खूप पकवतोस”, गेलकडून चहल ट्रोल - chris gayle and chahal troll news
गेल म्हणाला, “मी टिक टॉकला तुला ब्लॉक करायला सांगणार आहे. प्रत्यक्षात तू सोशल मीडियावर खूप पकवतोस. तुला आता सोशल मीडिया सोडण्याची गरज आहे. आम्ही तुला कंटाळलो आहोत. मी तूला परत पाहण्यास उत्सुक नाही. मी तुला ब्लॉक करणार आहे.”

“सोशल मीडियावर तू खूप पकवतोस”, गेलकडून चहल ट्रोल
गेल म्हणाला, “मी टिक-टॉकला तुला ब्लॉक करायला सांगणार आहे. प्रत्यक्षात तू सोशल मीडियावर खूप पकवतोस. तुला आता सोशल मीडिया सोडण्याची गरज आहे. आम्ही तुला कंटाळलो आहोत. मी तूला परत पाहण्यास उत्सुक नाही. मी तुला ब्लॉक करणार आहे.”
चहल ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, विराट आणि डिव्हिलियर्स यांच्यात झालेल्या बातचीतमध्येही तो ट्रोल झाला होता. हे दोघे फलंदाज चहलसमवेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सदस्य आहेत.