नवी दिल्ली - दिवाळी सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जात आहे. दिवाळीचे औचित्य साधून खेळाडूंनीही चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारतीय खेळाडूचं नाहीत तर विदेशी खेळाडूंनी भारतीयांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताची माजी सलामीवीर जोडी गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन, इशांत शर्मा यांच्यासह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.