नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेट खेळलेला नाही. त्याच्या निवृत्तीच्या गप्पा अजूनही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अनेक क्रीडापंडितांनी धोनीला निवृत्तीचा सल्ला दिला आहे. मात्र, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने याप्रकरणी आपले मत मांडले. ''धोनी जर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल, तर तो अजूनही भारतीय संघासाठी चांगली फलंदाजी करू शकतो'', असे गंभीर म्हणाला. सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी धोनी हा अजूनही सर्वोत्तम पर्याय असून, तो पहिल्यासारखाच खेळल्यास भारतीय संघाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, असेही गंभीरने यावेळी सांगितले.
धोनी भारतासाठी अजूनही खेळू शकतो - गंभीर
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला, ''वय हा केवळ आकडा असून त्याद्वारे तुम्ही एखाद्या खेळाडूच्या कामगिरीचे मोजमाप करू शकत नाही. माझ्या मते धोनी भारतीय संघासाठी पहिल्यासारखीच फलंदाजी करू शकतो आणि त्याने भारतासाठी अजून काही वर्षे खेळावे. निवृत्तीचा निर्णय हा केवळ धोनीनेच घेतला पाहिजे. त्यासाठी त्याच्यावर कोणीच दबाव टाकू शकत नाही.''

19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून धोनी याद्वारे क्रिकेटच्या मैदानावर एका वर्षानंतर पाऊल ठेवणार आहे. आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतो यावरच त्याचे भारतीय संघातील भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे ही स्पर्धा धोनीसाठी खूप महत्वाची मानली जात आहे.