नवी दिल्ली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका अ या संघामध्ये ५ एकदिवसीय सामन्याची अनौपचारिक मालिका नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनने ४८ चेंडूत ९१ धावांची दणकेबाज खेळी केली. या खेळीनंतर, भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने सॅमसनचे कौतुक करत, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर संजू योग्य पर्याय असल्याचे म्हटले आहे. हरभजनच्या या मतावर गौतम गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे.
मातब्बर फलंदाजांची दांडी 'गुल' करणारे अब्दुल कादिरशी सचिन तेंडूलकरने घेतला होता पंगा
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा हरभजन यांच्या मतावर म्हणतो, 'संजू आता चंद्रावरही फलंदाजी करु शकतो.'