महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गंभीर म्हणतो....भारतीय संघात अजून एका वेगवान गोलंदाजाची आवश्यकता - world cup squad

गोलंदाजीसाठी हार्दिक पांड्या आणि विजय शंकरवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही

गौतम गंभीर

By

Published : May 16, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली -दोन वेळा विश्‍वकरंडक स्‍पर्धा जिंकलेला भारतीय संघ ५ जूनला साउथम्पटनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत आपला पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघाबाबात बोलताना माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीर म्हणाला, की भारतीय संघात अजून एका गोलंदाजाची गरज आहे.

पुढे बोलताना गंभीर म्हणाला, 'जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार संघात असतानाही अजून एका वेगवान गोलंदाजाची गरज भारताला भासणार आहे. तुम्ही म्हणाल, की हार्दिक पांड्या आणि विजय शंकर असताना अजून एका गोलंदाजाची गरजच काय? मात्र मी या दोन्ही खेळाडूंवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही.'

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचेही गंभीर म्हणाला. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांसोबत लढणार असल्याने यातूनच जगाला खरा विश्वविजेता मिळेल असेही तो म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details