नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्ज संघाविषयी भाकित वर्तवले आहे. चेन्नईचा संघ आयपीएल २०२१ मध्ये प्ले ऑफ फेरी गाठू शकणार नाही, असे गंभीरने म्हटलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने, चेन्नईचा संघ या हंगामात ५ व्या क्रमाकांवर राहिल, असे म्हटलं आहे.
गंभीर शिवाय आकाश चोप्रा आणि संजय मांजरेकर यांना देखील असेच वाटतं की, धोनीच्या नेतृत्वात खेळणारा चेन्नईचा संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, मला वाटत चेन्नईचे प्रदर्शन मागील हंगामाच्या तुलनेत थोडेसे अधिक चांगले राहिल. पण ते क्वॉलिफिकेशन पासून दूर राहतील.
दुसरीकडे वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज इयॉन विशप यांनी चेन्नईचा संघ प्ले ऑफ फेरी गाठू शकतो, असे म्हटलं आहे. त्यांनी लीग स्टेजमध्ये चेन्नईचा संघ चौथ्या क्रमाकांवर राहिल, अशी भविष्यवाणी केली आहे.