मुंबई -भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराट कोहलीचा उल्लेख 'स्मार्ट क्रिकेटपटू' असा केला आहे. गंभीरने विराटचे कौतुक करत म्हटले, ''विराट हा नेहमी स्मार्ट क्रिकेटपटू होता. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमी यश मिळाले. त्याने आपली टी-20 कारकीर्द बदलून टाकली आणि हे त्याच्या तंदुरुस्तीमुळे झाले आहे.''
गंभीरने एका क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमात आपले मत दिले. तो म्हणाला, ''विराटकडे ख्रिस गेलसारखी ताकद नाही. डीव्हिलियर्ससारखी क्षमता नाही. त्याच्याकडे जॅक कॅलिस आणि ब्रायन लारासारखी पात्रता नाही. त्याची सर्वात मोठी शक्ती ही त्याची तंदुरुस्ती आहे. त्याने आपला खेळही चांगला बदलला आहे. त्यामुळे तो यशस्वी झाला आहे. मुख्य म्हणजे, विकेट्सदरम्यान तो खूप चांगला धावतो, जे बहुतेक लोक करण्यास सक्षम नाहीत. "