फ्लोरिडा -विंडीजच्या ९६ धावांच्या आव्हान भारताने १६ चेंडू राखून पूर्ण केले असले तरी भारताला हा विजय मिळवण्यासाठी सहा फलदांज गमवावे लागले. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने ३ बळी घेतले. त्याने केलेल्या कामगिरीचे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कौतूक केले आहे. हे कौतूक करताना त्याने माजी खेळाडू बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांच्यावर टीका केली आहे.
'बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांचा मधला स्टम्प तू उडवला आहेस' - navdeep saini
आयपीएलच्या वेळी भारताचे माजी खेळाडू बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांनी नवदीप सैनी आणि नितीश राणा या दोन खेळाडूंना दिल्लीच्या संघात निवड करण्यासाठी नकार दिला होता.
गंभीरने आपल्या ट्विटमध्ये नवदीप सैनीचे अभिनंदन करत 'बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांचा मधला स्टम्प तू उडवला आहेस' असे म्हटले आहे. 'सोबतच तुझी क्रिकेटची कारकीर्द संपवू पाहणाऱ्या लोकांची तू विकेट घेतली आहेस', असा टोमणाही त्याने बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांना लगावला आहे.
आयपीएलच्या वेळी भारताचे माजी खेळाडू बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांनी नवदीप सैनी आणि नितीश राणा या दोन खेळाडूंना दिल्लीच्या संघात निवड करण्यासाठी नकार दिला होता. याविरोधात मात्र, गंभीरने त्यांचे ऐकले नव्हते. या दोन खेळाडूंची टीम इंडियात निवड झाली नाही तर, मी कर्णधारपद सोडेन असे आव्हान त्याने दिले होते. काल झालेल्या सामन्यात सैनीने शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड या फलंदाजांना माघारी धाडले.