IPL : गौतम गंभीरला आवडणाऱ्या ४ संघांमध्ये धोनीच्या 'चेन्नई'ला स्थान नाही
गौतम गंभीरने अनेक वर्षे कोलकाता नाइट रायडर्स संघाचे कर्णधारपद संभाळले आहे. २०१२ आणि २१४ मध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने विजेतेपदही मिळवले आहे.
कोलकाता- आयपीएलच्या १२ व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक क्रिकेट जाणकारांनी विजेतेपदाविषयीची आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहेत. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनेही या मोसमात स्व:ताला आवडणाऱ्या आणि विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या ४ संघाची नावे सांगितली आहेत. मात्र या संघामध्ये गंभीरने ३ वेळचा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला स्थान दिले नाहीय.
गंभीरने मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाना विजेतेपदासाठीचे प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. या ४ संघात चेन्नईचे नाव न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण चेन्नईचा संघ इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघापैंकी एक असून तो गेल्या मोसमाचा विजेताही राहीला आहे.