नवी दिल्ली - अरुण जेटली स्टेडियममधील एका स्टँडला भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरचे नाव देण्यात आले आहे. मंगळवारी या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे याचे उद्घाटन खुद्द गंभीरने केले.
राजधानी दिल्लीत स्थित असलेल्या अरुण जेठली स्टेडियममध्ये फिरकीपटू बिशन सिंह बेदी, मोहिंदर अमरनाथ आणि विराट कोहली यांच्या नावानेही स्टँड उभारण्यात आला आहे. स्टँडला गंभीरचे नाव देण्याचा प्रस्तावाला डीडीसीएने याच वर्षी मंजूरी दिली होती.
यावेळी बोलताना गंभीर म्हणाला, 'मी क्रिकेट जिथे शिकलो. तेथील मैदानावर माझ्या नावाने स्टँड असणे, ही बाब माझ्यासाठी अभिमास्पद असून डीडीसीएने स्टँडला माझे नाव देऊन माझा सन्मान केला आहे. याचा मला आनंद आहे.'