मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० ने पिछाडीवर आहे. अशात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्याने, तो भारतात परतला आहे. भारतीय संघ यामुळे अडचणीत आला आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने, भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला दिला आहे.
एका क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला पाहिजे. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं.'
अजिंक्य रहाणे आता विराटच्या जागेवर संघाचे नेतृत्व करत आहे. त्याला मी विराटच्या जागेवर म्हणजे चौथ्या क्रमाकांवर फलंदाजी करताना पाहू इच्छितो. मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघात लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि शुबमल गिल या तिघांना अंतिम संघात स्थान मिळायला हवे, असे देखील गंभीरने सांगितलं.
राहुल पाचव्या तर पंतने सहाव्या स्थानावर फलंदाजी करायला हवी. यानंतर रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा नंबर येईल. मला वाटत की, भारतीय संघात पाच गोलंदाज हवे, असे देखील गंभीरने सुचवले आहे.
टीम इंडिया कसोटी मालिकेत पिछाडीवर