नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने परत एकदा बिशनसिंग बेदीवर टीकास्त्र सोडले आहे. गौतमने बेदींवर 'गंभीर' टीका करत 'अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी बिशन बेदींनी खूप प्रयत्न केले होते.' असे म्हटले आहे.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांचा बिशन बेदींवर गंभीर आरोप - gambhir on bedi
गौतम गंभीरने दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदीवर परत एकदा टीकास्त्र सोडले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या विंडीजविरुद्धच्या कामगिरीचे कौतूक करताना गंभीरने यापूर्वी एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये त्याने बिशनसिंह बेदी आणि चेतन चौहान यांचा मधला स्टम्प सैनीने उडवला आहे' असे म्हटले होते. या ट्विटला उत्तर देताना बेदींनी निराधार म्हटले. त्यांनी 'गंभीरने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊ नये असे' सांगितले होते.
बेदींच्या या उत्तरावर गंभीरने अजून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने, 'बेदी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊ नये असे म्हणतात. पण ती अशी व्यक्ती आहे जिने अंगदचा दिल्ली क्रिकेटमध्ये समावेश करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. चेतन चौहान हेसुद्धा आपल्या पुतण्याला डीडीसीएमध्ये आणण्यासाठी उत्सुक होते.' असे म्हटले आहे. या ट्विटसोबत त्याने एक २०१३ चे एक पत्रक लावले आहे. या पत्रात बेदींनी नवदीप सैनीला दिल्ली (एनसीआर) चा नसल्यामुळे बंदी केली होती.