मेलबर्न -बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आगामी काळात ४ देशांसोबत मालिका खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 'नाविन्यपूर्ण' असल्याचे मत क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांनी दिले. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अन्य संघ यांच्यात एकदिवसीय स्पर्धा होण्याची कल्पना गांगुलीने व्यक्त केली असून या संकल्पनेवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
हेही वाचा -जाणून घ्या.. नवीन वर्षासाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
रॉबर्ट्स म्हणाले, 'हे अभिनव विचारांचे उदाहरण आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांचे विचार सकारात्मक आहेत. गांगुलीने इतक्या कमी वेळात बरीच नवीन कामे केली. भारताने पहिली डे-नाईट टेस्ट खेळली. आणि आता त्याने सुपर सिरीजची कल्पना आणली आहे, जी बऱ्यापैकी नाविन्यपूर्ण आहे.'
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेस यापूर्वीच सहमती दर्शविली आहे. पुढील महिन्यात भारत आणि बांग्लादेशचा दौरा करणार असून त्याच वेळी या स्पर्धेबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे सीएने म्हटले आहे.