महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

चॅपेल म्हणतात, 'कोहली-रोहितपेक्षा सचिन अन् गांगुलीने केलाय घातक गोलंदाजांचा सामना'

'टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली आणि शर्मा यांची सर्वोत्तम जोडी आहे. त्यांचे यामधील विक्रम उत्कृष्ट आहेत. दोन्ही स्वरूपात कोहलीने सरासरी ५० हून अधिक धावा केल्या आहेत. सचिनने फारच कमी टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि टी-२० लोकप्रिय होईपर्यंत, गांगुलीची कारकीर्द संपली होती', असेही चॅपेल म्हणाले आहेत.

Ganguly-Sachin faces best bowlers compared to Kohli-Rohit says ian chappell
चॅपेल म्हणतात, 'कोहली-रोहितपेक्षा सचिन आणि गांगुलीने केलाय घातक गोलंदाजांचा सामना'

By

Published : Dec 22, 2019, 8:14 PM IST

नवी दिल्ली -क्रिकेटविश्वात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि 'हिटमॅन' रोहित शर्मा यांनी अनेक विक्रम सर केले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांना कोहली- रोहितपेक्षा सचिन आणि गांगुलीची जोडी खास वाटते. 'कोहली- रोहितपेक्षा सचिन आणि गांगुलीने घातक गोलंदाजांचा सामना केला होता', असे मत चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -IND vs WI : मोहम्मद शमी जगभरातील गोलंदाजांवर ठरला भारी

'असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की कोहली आणि शर्मा हे एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचे सर्वोत्तम फलंदाज आहेत. मात्र, सचिन आणि सौरव यांची अशी जोडी होती त्यांनी १५ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना हैराण केले होते. पाकिस्तानचा वसीम अक्रम आणि वकार युनिस, वेस्ट इंडिजचे कर्टनी अँब्रोस आणि कर्टनी वॉल्श, ऑस्ट्रेलियाचे ग्लेन मॅग्रा आणि ब्रेट ली, दक्षिण आफ्रिकेचा अ‍ॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलाक, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि चमिंडा वास या दिग्गज गोलंदाजांचा सामना सचिन-सौरव जोडीने केला होता. या गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजांचा कस लागतो', असे चॅपल यांनी म्हटले आहे.

'टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली आणि शर्मा यांची सर्वोत्तम जोडी आहे. त्यांचे यामधील विक्रम उत्कृष्ट आहेत. दोन्ही स्वरूपात कोहलीने सरासरी ५० हून अधिक धावा केल्या आहेत. सचिनने फारच कमी टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि टी-२० लोकप्रिय होईपर्यंत, गांगुलीची कारकीर्द संपली होती', असेही चॅपेल म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details