कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येऊ शकते, अशी माहिती रुग्णालयामधील सूत्रांनी दिली. गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गांगुली यांना शनिवार (ता. २) सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तात्काळ कोलकातामधील वूडलँड या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. शनिवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
सौरव गांगुली यांच्यावर उपचार करण्यासाठी नऊ सदस्यीय वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. गांगुली यांच्या प्रकृतीविषयी कार्डिअॅक सर्जन देवी शेट्टी, रमाकांत पांडा, कार्डिओलॉजिस्ट सॅम्युल मॅथ्युज, सामीन शर्मा, कार्डिओलॉजिस्ट अश्विन मेहता यांची मते झूम अॅप तसेच फोनच्या माध्यमातून जाणून घेण्यात आली.