महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी 'दादा'च -

प्रशासकीय समितीच्या अनुसार सीएबी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा  (एजीएम) शनिवारी आयोजित करणार आहे. निवडणूक अधिकारी सुशांता रंजन उपाध्याय यांनी सांगितले, 'मी बंगाल क्रिकेट असोसिएशनची निवडणूक अधिकारी म्हणून घोषित करते की, काही लोकांना बिनविरोध निवडले गेले आहे.'

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी 'दादा'च

By

Published : Sep 27, 2019, 12:00 PM IST

कोलकाता -भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सीएबीच्या एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली. गांगुली आता जुलै २०२० पर्यंत सीएबीच्या अध्यक्षपदी राहणार आहे.

हेही वाचा -हॉकी : भारतीय संघाने उडवला विश्वविजेता बेल्जियमचा २-० धुव्वा

प्रशासकीय समितीच्या अनुसार सीएबी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवारी आयोजित करणार आहे. निवडणूक अधिकारी सुशांता रंजन उपाध्याय यांनी सांगितले, 'मी बंगाल क्रिकेट असोसिएशनची निवडणूक अधिकारी म्हणून घोषित करते की, काही लोकांना बिनविरोध निवडले गेले आहे.'

याअगोदर सर्वोच्च न्यायालयाने गांगुलीला सीएबीच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. जगमोहन दालमिया यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये दादाची सीएबीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

पॅनेल -

  • अध्यक्ष : सौरभ गांगुली
  • उपाध्यक्ष : नरेश ओझा
  • सचिव : अविषेक डालमिया
  • संयुक्त सचिव : देवव्रत दास
  • कोषाध्यक्ष : देबाशीष गांगुली

ABOUT THE AUTHOR

...view details