महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गंभीरने सांगितली 'त्या' अपूर्ण राहिलेल्या शतकाची कहाणी...धोनीला ठरवले दोषी - धोनी-गंभीर लेटेस्ट न्यूज

२०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील श्रीलंकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गंभीर ९७ धावांवर बाद झाला होता. गंभीर म्हणाला, 'मला हा प्रश्न बर्‍याच वेळा विचारण्यात आला की जेव्हा मी ९७ धावांवर होतो तेव्हा काय झाले. ही धावसंख्या गाठण्यापूर्वी मी माझ्या वैयक्तिक धावसंख्येचा कधीच विचार केला नव्हता. माझ्या मनात मी फक्त श्रीलंकेचे लक्ष्य ठेवले होते. मला आठवते की,  एक षटक संपल्यावर धोनी आणि मी क्रीजवर होतो. त्याने मला सांगितले की 'तीन धावा बाकी आहेत, या तीन धावा कर आणि तुझे शतक पूर्ण होईल'.

गंभीरने सांगितली 'त्या' अपूर्ण राहिलेल्या शतकाची कहाणी

By

Published : Nov 18, 2019, 10:17 AM IST

नवी दिल्ली -भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील अपूर्ण राहिलेल्या शतकाची कहाणी सांगत 'कॅप्टन कुल' धोनीला दोषी ठरवले आहे. शतकापासून अवघ्या तीन धावा दूर असताना धोनीने मला माझ्या शतकाची आठवण करून दिली, त्यामुळे मी बाद झालो असल्याचे गंभीरने म्हटले आहे.

हेही वाचा -बीसीसीआयच्या 'बॉस'ला क्लीन चीट

२०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील श्रीलंकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गंभीर ९७ धावांवर बाद झाला होता. गंभीर म्हणाला, 'मला हा प्रश्न बर्‍याच वेळा विचारण्यात आला की जेव्हा मी ९७ धावांवर होतो तेव्हा काय झाले. ही धावसंख्या गाठण्यापूर्वी मी माझ्या वैयक्तिक धावसंख्येचा कधीच विचार केला नव्हता. माझ्या मनात मी फक्त श्रीलंकेचे लक्ष्य ठेवले होते. मला आठवते की, एक षटक संपल्यावर धोनी आणि मी क्रीजवर होतो. त्याने मला सांगितले की 'तीन धावा बाकी आहेत, या तीन धावा कर आणि तुझे शतक पूर्ण होईल'.

'अचानक, जेव्हा आपले मन आपल्या वैयक्तिक कार्यक्षमतेकडे जाते, तेव्हा कुठेतरी आपल्याल थोडेसे घाबरून जाणवते. यापूर्वी माझे लक्ष्य फक्त श्रीलंकेच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यावर होते. जर तेच लक्ष्य माझ्या मनात राहिले असते तर मी सहजपणे माझे शतक ठोकले असते', असे गंभीरने म्हटले आहे. गंभीरच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details