महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

असा गोलंदाज तुम्हाला शोधून सापडणार नाही!...पाहा मजेशीर व्हिडिओ - cricket fail in house

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दरवाजाच्या आडून गोलंदाजी करताना दिसते. चेंडू टाकल्यानंतर ही व्यक्ती थेट समोर असलेल्या स्टेजला जाऊन धडकते.

funny house cricket bowler crashes on batsman end
असा गोलंदाज तुम्हाला शोधून सापडणार नाही!...पाहा मजेशीर व्हिडिओ

By

Published : Feb 10, 2020, 6:04 PM IST

नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणे खरचं कठीण आहे. विजयाच्या दिशेने सहज वाटचाल करणारा संघ अचानक पराभवाच्या दिशेने झुकलेला असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. क्रिकेटमध्ये जेवढे तणावाचे प्रसंग असतात तेवढेच मजेशीर प्रसंगही आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा -भारताविरूद्धच्या शेवटच्या वनडेसाठी सोधी आणि टिकनर संघात दाखल

या व्हिडिओमध्ये एका घरात क्रिकेटचा सामना सुरू आहे. या सामन्यात एक व्यक्ती दरवाजाच्या आडून गोलंदाजी करताना दिसते. चेंडू टाकल्यानंतर ही व्यक्ती थेट समोर असलेल्या स्टेजला जाऊन धडकते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details