दुबई - पाकिस्तान सुपर लीगच्या चौथ्या सत्रास दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. पीएसएलमध्ये यंदा ६ संघाचा सहभाग असणार आहे. यात दोनदा चॅम्पियन ठरलेला इस्लामाबाद युनायटेड, एक वेळचा विजेता पेशावर जुल्मी संघ तसेच लाहोर कलंदर, मुल्तान सुल्तान, कराची किंग्स आणि क्वेटा ग्लेडिएटर या संघाचा समावेश आहे. पीएसएलच्या चौथ्या सत्राचे लाईव्ह प्रसारण डी स्पोर्ट्स चॅनलवर होणार आहे.
दुबईत पाकिस्तान सुपर लीगला सुरुवात, ६ संघाचा सहभाग
लीग १४ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे. यात ३४ सामने खेळविले जातील. यूएईमधील दुबई, शारजाह आणि अबूधाबी तसेच पाकिस्तानमधील कराची आणि लाहोर येथे ही लीग खेळविली जाणार आहे.
लीग १४ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे. यात ३४ सामने खेळविले जातील. यूएईमधील दुबई, शारजाह आणि अबूधाबी तसेच पाकिस्तानमधील कराची आणि लाहोर येथे ही लीग खेळविली जाणार आहे. अंतिम सामना १७ मार्च रोजी होईल. इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर पाकिस्तानने २०१५ मध्ये पीएसएल ही लीग सुरु केली आहे.
पीसीबी या लीग द्वारे पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा आणू इच्छिते. २००९ साली श्रीलंका संघावर हल्ला झाला होती. त्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात येऊन क्रिकेट सामने खेळत नाही. यंदा पाकिस्तानात ८ सामने होणार आहेत. या लीगमध्ये एबी डिविलियर्स, ल्युक रॉची, केरॉन पोलार्ड, डेरेन सॅमी, ख्रिस जॉर्डन, शेन वॉटसन, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो सारखे खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसून येतील.