साऊथम्प्टन - एजेस बाऊलवर सुरू असलेल्या इंग्लंड आणि पाकिस्तानमधील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीही पावसाने वर्चस्व राखले. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या दोन सत्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ही कसोटी आता बरोबरीत सुटण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला सुरूवात केली असून उपाहारापर्यंत त्यांनी १ बाद ७ धावा केल्या होत्या.
उपाहारापर्यंत इंग्लंडकडून डॉम सिब्ले २ आणि जॅक क्रॉले ५ धावांवर खेळत होते. रोरी बर्न्स खाते न उघडता शाहिन आफ्रिदीच्या चेंडूवर तंबूत परतला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू खेळवता आला नाही.