ढाका -वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज ओटीस गिब्सन यांची बांगलादेश क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ५० वर्षीय गिब्सन यांचा बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी (बीसीबी) दोन वर्षांचा करार झाला असून २०२२ पर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतील.
हेही वाचा -IPL २०२० : शिखरच्या आयपीएल खेळण्यावरही साशंकता, दिल्लीला 'हदरा' ?
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज चार्ल लेंगेव्हल्डला गिब्सन 'रिप्लेस' करतील. लेंगेव्हल्डने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गोलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
२००७ मध्ये गिब्सन यांनी क्रिकेटमधून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. गिब्सन आता लवकरच बांगलादेश संघात सामील होतील. बांगलादेश क्रिकेट संघाला आगामी काळात पाकिस्तान दौरा करावा लागणार आहे. तेथे त्यांना २४ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.