महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा अपघातात मृत्यू! - West Indies fast bowler latest death

१९९०मध्ये मोजली यांनी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. १९९०-९१ या काळात त्यांनी नऊ एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते.

इजरा मोजली
इजरा मोजली

By

Published : Feb 7, 2021, 12:16 PM IST

नवी दिल्ली -वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज इजरा मोजली यांचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. ते ६३ वर्षांचे होते. मीडिया रिपोर्टनुसार, सायकलवरून जात असताना मोजलींना एका कारने धडक दिली.

इजरा मोजली

१९९०मध्ये मोजली यांनी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. १९९०-९१ या काळात त्यांनी नऊ एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते. यापूर्वी त्यांनी १९८२-८३मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र मोजली यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि इंग्लिश काउंटी स्पर्धेत ग्लॅमरगॉनकडून सामने खेळले.

हेही वाचा - स्टीव्ह स्मिथ ठरला ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू

२०१६मध्ये वेस्ट इंडिजच्या महिला संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला. या संघाचे मोजली सहाय्यक प्रशिक्षक होते.

इजरा मोजली

ABOUT THE AUTHOR

...view details