मुंबई - भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रमेश गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव होते. पत्नी व दोन मुली असा त्यांचा परिवार आहे.
भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन - माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन
Nadkarni was 86 and is survived by his wife and two daughters.भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन
बापू नाडकर्णी यांच्या खास गोलंदाजीच्या शैलीमुळे त्यांची क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण झाली होती.
नाशिक जिल्ह्यात 4 एप्रिल 1933 मध्ये नाडकर्णी यांचा जन्म झाला होता. रमेश गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव असून क्रिकेटविश्व त्यांना बापू नाडकर्णी याच नावाने ओळखले जायचे. त्यांनी 41 कसोटी 25.70 च्या सरासरीने एक शतक व 7 अर्धशतकांसह 1414 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत 29.07 च्या सरासरीनं 88 विकेट्स घेतल्या होत्या. 1968 मध्ये त्यांनी अखेरचा कसोटी सामना खेळला होता.