मुंबई- स्कॉटलंडचा क्रिकेटपटू माजीद हक याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. माजीदने स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झालेला माजीद हा पहिलाच व्यावसायिक क्रिकेटपटू आहे.
३७ वर्षीय माजीद म्हणाला, 'कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यातून बरा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पैस्ली येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले आहे आणि त्यांच्याकडून योग्य ते उपचार केले जात आहेत. माझ्या तंदुरुस्तीसाठी मेसेज करणाऱ्यांचे आभार. अल्लाहच्या कृपेने हा चित्ता लवकरच बरा होईल.'
माजीद हकने ५४ एकदिवसीय आणि २१ टी-२० सामन्यांत स्कॉटलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २००७ मध्ये त्याने भारताविरुद्ध एकमेव एकदिवसीय सामना खेळला होता. स्कॉटलंडकडून सर्वाधिक ६० विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.