जोधपूर (राजस्थान) -माजी रणजी खेळाडू आणि जोधपूर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक नरेंद्र सिंह पवार यांनी आत्महत्या केली. जोधपूरच्या ओल्ड कँम्पमधील एका खोलीत त्यांनी गळफास घेतला.
नरेंद्र सिंह पवार यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. ते सायंकाळी घरी आल्यानंतर व्यवस्थित बोलत नव्हते. तसेच ते घरी जेवतही नव्हते. त्यांना काही लोकांकडून धमकी दिली गेली असल्याचा आमचा संशय आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यात यावा.
दरम्यान, नरेंद्र यांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या ठिकाणी त्याचा मोबाईल होता. पण त्यातील सर्व डेटा हा डिलीट करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे संशय आणखी वाढला आहे.