कराची - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. जगभरात या विषाणूमुळे १३ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. याचा पाकिस्तानमध्येही प्रसार झाला आहे. पाकिस्तानमधील जवळपास ५०० पेक्षा अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूची भीती आता पाकिस्तान संघाचा माजी फिरकीपटू गोलंदाज दानिश कनेरियालाही वाटू लागली आहे. त्याने थेट प्रभू श्रीरामाकडे साकडं घातलं आहे. तसेच तो माता राणीकडे धावा करत आहे.
दानिश कनेरियाने ट्विट केलं असून त्यात तो कोरोनाच्या भीतीने प्रभू श्रीरामाकडे धावा करताना दिसत आहे. दानिश म्हणतो की, 'प्रभू श्रीराम, सगळ्यांना चांगलं आरोग्य देवो. मी कोरोना विषाणूपासून सर्वाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.'