लाहोर - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सर्फराज अख्तरचे सोमवारी वयाच्या ४३ व्या वर्षी निधन झाले आहे. रक्ताच्या कर्करोगामुळे अख्तरचे निधन झाले असल्याची माहिती पाक मीडियाकडून देण्यात आली आहे. तसेच पाक क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अख्तरचे निधन झाल्याचे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अख्तरचे निधन - cricket
अख्तरने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी ४ एकदिवसीय तर ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अख्तरचे निधन
अख्तरने पाकिस्तान क्रिकेट संघासाठी ४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने ६६ धावा केल्या आहेत. तर ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना ११२ धावा केल्या आहेत. तेसेच अख्तरने ११८ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये ५ हजार ७२० धावा केल्या आहेत. तर 'अ' श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ९८ सामने खेळले असून २ हजार ६३६ धावा केल्या आहेत.