मुंबई- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या आक्रमक फलंदाजीसोबत मैदानातल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. विराटच्या या स्वभावाचे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने कौतुक केले आहे. त्यासोबत त्यांनी विराटशी गोलंदाजांनी पंगा घेऊ नये, असा सल्ला दिला आहे.
रशिद लतिफ यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यात ते म्हणतात, धोनीने २०१४ ला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्याच्या कसोटी मालिकेनंतर कसोटीमधून निवृत्ती स्वीकारली. या मालिकेत खेळताना विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन यांच्यात मैदानात खडाजंगी पाहायला मिळाली. त्यावेळी विराटच्या वागण्यात आक्रमकता होती. काही खेळाडू असे असतात की, त्यांच्याशी पंगा घ्यायचा नसतो. पाकिस्तानकडे जावेद मियाँदाद या प्रकारातले खेळाडू होते. व्हिव रिचर्ड्स, सुनिल गावसकर यांच्यासोबत आता विराट कोहलीचे नावही या यादीत जोडले पाहिजे.'
विराटने यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतही त्यांची आक्रमकता दाखवली. त्याने केजरिक विल्यम्सला त्याच्यात शैलीत सडेतोड उत्तर देत, बोलती बंद केली होती. त्यामुळे सामन्यादरम्यान गोलंदाजांनी विराटशी पंगा घेऊ नये, असा सल्ला लतिफने गोलंदाजांना दिला आहे.