इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये निम्रिता चंदानी नामक हिंदू मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. निम्रिताच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिला न्याय मिळावा, यासाठी 'जस्टिस फॉर निम्रिता' मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सामिल झाला आहे. त्याने निम्रिता मृत्यू प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा -Cricket Records: कसोटीत चिवट फलंदाज स्टीव्ह स्मिथला 'शुन्या'वर बाद करणारे ४ गोलंदाज
निम्रिता पाकिस्तानच्या लारकाना शहरात बिबी असिफा डेंटल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवत होती. सोमवारी कॉलेजच्या वसतिगृहाच्या खोलीमध्ये निम्रिताचा मृतदेह आढळला. दरम्यान, निम्रिताची हत्या व्देष भावनेतून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.