महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शाहिद आफ्रिदीला पाचवी मुलगी; सोशल मीडिया युझर्स म्हणाले, बस्स कर यार... - शाहिद आफ्रिदीचे कुटूंब

आफ्रिदीने काल १४ फेब्रुवारी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो की, ईश्वराचा आशीर्वाद आणि कृपा माझ्यावर आहे. माझ्या चार मुली आहेत आणि आता पाचवी झाली आहे. ही बातमी मला तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होत आहे.'

Former Pak cricketer Shahid Afridi blessed with fifth daughter, shares 'good news' with fans
शाहिद आफ्रिदीला पाचवी मुलगी; सोशल मीडिया युझर्स म्हणाले, बस्स कर यार...

By

Published : Feb 15, 2020, 12:24 PM IST

कराची- पाकिस्तानचा माजी अष्ठपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बाप झाला आहे. त्याने पाचव्यांदा मुलगी झाली असल्याची बातमी आपल्या सोशल मीडियावरुन दिली. आफ्रिदीने दिलेल्या या बातमीवर चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्याच बरोबर अनेकांनी आणखी किती मुलांना जन्म देणार? बस कर आता हे क्रिकेटचे मैदान नाही, सिक्सर मारूनच थांबणार आफ्रिदी, असं म्हटलं आहे.

आफ्रिदीने काल १४ फेब्रुवारी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो की, ईश्वराचा आशीर्वाद आणि कृपा माझ्यावर आहे. माझ्या चार मुली आहेत आणि आता पाचवी झाली आहे. ही बातमी मला तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होत आहे.'

आफ्रिदीच्या या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. वाचा काय म्हणत आहेत नेटिझन्स...

दरम्यान आफ्रिदीला याआधी चार मुली आहेत. त्यांची नावे अजवा, अंसा, अक्सा आणि असमारा अशी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details