वेलिंग्टन- कोरोना विषाणूने जगात थैमान घातलेले असताना, न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डेनियल फ्लिनने क्रिकेट कारकिर्दीला रामराम केला आहे. ३४ वर्षीय फ्लिनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
फ्लिनने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत २४ कसोटी, २० एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यात न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले. पण त्याला आपली छाप सोडता आली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ५ अर्धशतके झळकावली आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ९५ आहे. ही खेळी त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध केली होती.
फ्लिनला २०१३ नंतर न्यूझीलंड संघामध्ये पुनरागमन करता आले नाही. पण, तो स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वी फलंदाज म्हणून परिचित आहे. त्यांची बॅट स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलीच तळपली आहे.