महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंडच्या इयान स्मिथ यांना 'बर्ट सटक्लिफ' पदक - ian smith bert sutcliffe medal news

स्मिथ यांनी न्यूझीलंडकडून 63 कसोटी आणि 98 एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्मिथ यांनी 112 कसोटी सामन्यांमध्ये समालोचक म्हणून काम केले आहे. न्यूझीलंड क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांचे ते साक्षीदारही आहेत.

Former kiwi wicketkeeper ian smith and women cricketer sophie devine gets award
न्यूझीलंडच्या इयान स्मिथ यांना 'बर्ट सटक्लिफ' पदक

By

Published : Apr 28, 2020, 4:51 PM IST

वेलिंग्टन - न्यूझीलंडचे माजी यष्टिरक्षक फलंदाज इयान स्मिथ यांना क्रिकेटमध्ये उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल न्यूझीलंड क्रिकेटने (एनझेडसी) बर्ट सटक्लिफ पदक प्रदान केले आहे. न्यूझीलंड क्रिकेट व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात एनझेडसीचे अध्यक्ष ग्रेग बार्क्ले यांनी स्मिथ यांचा गौरव केला.

स्मिथ यांनी न्यूझीलंडकडून 63 कसोटी आणि 98 एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्मिथ यांनी 112 कसोटी सामन्यांमध्ये समालोचक म्हणून काम केले आहे. न्यूझीलंड क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांचे ते साक्षीदारही आहेत.

स्मिथ यांच्या अगोदर न्यूझीलंडचे माजी खेळाडू वॉल्टर हॅडली, मर्व वालेस, जॉन आर. रीड, ग्रॅहम डोवलिंग, सर रिचर्ड हॅडली आणि इव्हन चॅटफिल्ड यांनी हा पुरस्कार जिंकला आहे.

अन्य पुरस्कारांमध्ये सोफी डिवाईन आणि डेव्हन कॉनवे यांचा अनुक्रमे महिला आणि पुरुष टी-20 सुपर स्मॅश प्लेयर्स ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details