महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कुंबळे मैदानात आक्रमक आणि बाहेर नरम - ओझा - अनिल कुंबळे

ओझा म्हणाला, "कुंबळे चांगली स्पर्धा करायचा, पण मैदानाबाहेर तो खूप नरम स्वभावाचा होता." संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ओझा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.

former indian spinner pragyan ojha commented on aggression of anil kumble
कुंबळे मैदानात आक्रमक आणि बाहेर नरम - ओझा

By

Published : Jun 28, 2020, 3:08 PM IST

नवी दिल्ली -भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे क्रिकेटच्या मैदानात खूपच आक्रमक आणि मैदानाबाहेर नरम स्वभावाचा होता, असे माजी भारतीय फिरकीपटू प्रग्यान ओझाने सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 113 कसोटी बळी घेणाऱ्या ओझाने विस्डेनला सांगितले, की कुंबळे जेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत मैदानावर होता तेव्हा तो खूपच आक्रमक होता.

ओझा म्हणाला, "कुंबळे चांगली स्पर्धा करायचा, पण मैदानाबाहेरही तो खूप नरम स्वभावाचा होता." संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ओझा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.

ओझा पुढे म्हणाला, "सचिन पाजी खूप शांत होते. त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचे वेगळे मत होते. अनिल भाईंचे मत वेगळे आहे. धोनी आणि कोहली यांनाही देशासाठी खेळ जिंकण्याची इच्छा आहे, पण त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे."

ओझाने भारताकडून 24 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 113 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. याशिवाय त्याने 18 एकदिवसीय सामने आणि 6 टी -20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 21 आणि 10 बळी घेतले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details