महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांची प्रकृती स्थिर - कपील देव हृदयविकार न्यूज

एका वृत्तानुसार, कपिल देव यांच्यावर नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

former indian cricketer kapil dev suffers from heart attack
विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

By

Published : Oct 23, 2020, 3:00 PM IST

Updated : Oct 23, 2020, 5:17 PM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर नवी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयामध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक -

घरगुती क्रिकेटमध्ये गोलंदाजीची छाप पाडल्यानंतर कपिल देव यांनी १ ऑक्टोबर १९७८ला पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आणि याच महिन्याच्या १६ तारखेला पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. पदार्पणाच्या काही दिवसानंतर कपिल देव यांनी 'दादा' संघ अशी ओळख असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. पहिल्या २५ सामन्यात १०० गडी आणि १००० धावा करणारे कपिल देव पहिलेच भारतीय खेळाडू ठरले. 'हरियाणा हरिकेन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वात १९८३च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पहिल्यांदा विजेतेपद मिळवून दिले.

कसोटी कारकिर्दीत धावबाद न झालेला क्रिकेटपटू -

१९९४ मध्ये कपिल देव यांनी आपल्या १६ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. विशेष म्हणजे कपिल देव हे त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीतील १८४ डावात कधीच धावबाद झाले नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात ५०००हून अधिक धावा आणि ४००हून अधिक बळी टिपणारे ते एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत. ११ मार्च २०१० रोजी कपिल देव यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले. त्यांनी गॉड्स डिक्री', 'क्रिकेट माय स्टाईल', 'स्ट्रेट फ्रॉम द हार्ट', अशी तीन पुस्तके लिहिली आहेत. कपिल देव यांच्या जीवनावरही एक चित्रपट येणार असून बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्यांची भूमिका साकारली आहे.

Last Updated : Oct 23, 2020, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details