मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. तो राजकारणात येणार अशी, चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून रंगत होती. आज ती चर्चा खरी ठरली. बॉलीवूडमधील कलाकार आणि क्रिकेटपटू हे एका तपानंतर राजकारण प्रवेश करतात. गंभीरपूर्वी काही क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश करुन छाप सोडली आहे. त्या क्रिकेटपटूंची माहिती जाणून घेऊया.
नवजोत सिंग सिध्दू
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिध्द समालोचक नवजोत सिंग सिध्दू त्यांच्या हजरजबाबीपणामुळे राजकारणात आले. २००४ साली त्यांनी भाजपतून राजकारणात एंन्ट्री केली. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना दोनदा विजय मिळाला. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष आवाज-ए-पंजाब उभा केला. नंतर काँग्रेसशी मैत्री केले. सध्या ते पंजाब कॅबिनेट मंत्री आहेत.
मोहम्मद कैफ
चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद कैफने २००६ साली त्याचा शेवटचा सामना खेळला. २०१४ मध्ये तो काँग्रेससोबत हातमिळवणी करत इलाहाबाद येथे लोकसभेची निवडणूक लढली, पण त्याला यश आले नाही. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत आहे.
प्रवीण कुमार
भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने २०१७ साली मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत (समाजवादी पक्ष) सपमध्ये प्रवेश केला. गेल्यावर्षी प्रवीण कुमारने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.